• yesterday
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 09 March 2025 : ABP Majha 

संतोष देशमुखांच्या हत्येला आज तीन महिने पूर्ण. मात्र अजूनही एक आरोपी फरार.  
सरपंच संतोष देशमुखांना ज्या शस्त्रांनी मारलं त्याची रेखाचित्रे एसआयटीने चार्जशीटमध्ये जोडली, यात एक पांढरा पाईप, गॅसचा पाईप,  वायर लावलेली मूठ , गज आणि लाकडी दांडा या पाच वस्तूंचा समावेश आहे. 
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात निघालेल्या सद्भावना यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण, आज बीडमध्ये यात्रेचा होणार समारोप. 
सरपंच देशमुख यांची हत्या करणााऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करा, सर्व आरोपींची संपत्ती जप्त करा, मागणीसाठी अहिल्यानगरच्या पाथर्डीत बंदची हाक.मोर्चा काढून व्यक्त केला निषेध 
सकल मानवता वादी नागरिकांकडून परभणीतील जिंतूर आणि पूर्णा तालुक्यात कडकडीत बंद, संतोष देशमुख हत्याप्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. 
हिंगोलीत वाल्मिक कराड आणि संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी युवा सेनेचं आंदोलन, कराडच्या फोटोला जोडे मारत व्यक्त केला निषेध. 
दौंडमध्ये मराठा समाजाचं आंदोलन, संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना फाशी आणि धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची आंदोलकांची मागणी, काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त.

Category

🗞
News

Recommended