• 5 minutes ago
Manoj Jarange: संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंविरोधात पुरावे असूनही त्यांना सहआरोपी केले जात नाही. या विषयाला फुल स्टॉप द्या असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलिसांना गुप्त आदेश असल्याचा खळबळजनक आरोप मनोज जरांगे यांनी केलाय. इतक्या निर्घृणपणे हत्या घडवून आणणाऱ्या राजकीय गुंड मित्राला वाचवत असल्याची टीका त्यांनी पुन्हा एकदा केली .धनंजय मुंडे विषारी साप आहे .हा साप तुमच्यासमोर उभा राहणार आहे .त्यावेळी तुम्हाला पश्चातापाचा हात कपाळावर मारावा लागणार आहे .असेही मनोज जरांगे म्हणाले . (Manoj Jarange)

काय म्हणाले मनोज जरांगे ?
'धनंजय मुंडेंसाठी नंबर एकचा आरोपी काम करत होता . त्यांच्या सरकारी बंगल्यावर तशा बैठका झाल्या आहेत .पहिली बैठक त्यांच्या एका कार्यालयावर झाली .त्यामुळे 302 कलमांतर्गत धनंजय मुंडे यांना सह आरोपी करायला हवं .फरार आरोपींनी धनंजय मुंडे यांना फोन केले आहेत .खंडणी मागितल्यानंतर आणि खून झाल्यानंतरसुद्धा हे फोन झाले आहेत .पहिला आरोपी फोन उचलत नव्हता म्हणून इतर आरोपींनी धनंजय मुंडे यांच्याच कानावर फोन करून घातलं आहे अशी लोकांमध्ये चर्चा आहे .धनंजय मुंडे 302 मध्ये येतात पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला फुलस्टॉप दिलेला आहे .फडणवीस स्थानिक पोलिसांना सिग्नल देत नाहीत म्हणून धनंजय मुंडे वाचलेत .धनंजय मुंडे विषारी साप आहे .हा साप तुमच्यासमोर उभा राहणार आहे .त्यावेळी तुम्हाला पश्चातापाचा हात कपाळावर मारावा लागणार आहे .'असेही मनोज जरांगे म्हणाले .

Category

🗞
News

Recommended