• 2 years ago
‘जनप्रक्षोभ मोर्चा’वेळी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं. विद्यमान सरकार औटघटकेचे असून, ठाण्यातून निवडणूक लढून जिंकून दाखवणार, असं आदित्य ठाकरे म्हणाले. याला आता मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “लोकशाहीत कुठूनही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. शेवटी जनता ठरवत असते, कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला पाडायचं. बोलणाऱ्यांचा जन्मही झाला नव्हता, तेव्हापासून शाखाप्रमूख म्हणून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या नेतृत्वाखाली काम करत होतो,” असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.

#UddhavThackeray #EknathShinde #AdityaThackeray #HanumanJayanti #Thane #DhirendraShastri #NavneetRana #RaviRana #Amravati #BJP #Aurangabad #Maharashtra

Category

🗞
News

Recommended