गुलाबराव पाटलांची संजय राऊतांवर सडकून टीका

  • last year
संजय राऊत हे झोपेतून उठून काहीही बोलतात. ते काही सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश नाहीत. राऊत हे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना आहेत, अशी टीका पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केलीये. सध्याचे सरकार बेकायदेशीर आहे, त्यामुळे या सरकारचे आदेश पाळू नये, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा राऊत यांच्यावर तोफ डागलीय.
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews #GulabraoPatil