ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. 'रोज मंत्र्यांवर आरोप करण्याशिवाय दुसरा त्यांच्याकडे काहीच नाही. राज्यासाठी काय केलं? महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय केलं पाहिजे? कोणत्या योजना राबवल्या पाहिजे? असा प्रश्न कधी ऐकायला आला नाही. मंत्र्यांवर आरोप करण्याशिवाय उध्दव ठाकरे यांच्याकडे दुसरं भांडवल काही नाहीये' अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी आरोप केले.
Category
🗞
News