• 2 years ago
संजय राऊत यांनी आम्ही दिलेली मते परत करावी. त्यानंतर आमच्यावर टीका करावी. अन्यथा तोच कांदा तुमच्या तोंडावर फेकून मारू अशी संतप्त प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी संजय राऊतांच्या टीकेवर दिली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज मालेगाव येथील ठाकरे गटाच्या जाहीर सभेत शिंदे गटाच्या आमदारांवर सडकून टीका केली. संजय राऊत यांनी शेतकऱ्यांना भावना देणारे कांदे तसेच शिंदे व गुलाबराव पाटील यांना रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे अशी टीका केली होती या टीकेवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देत संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

#GulabraoPatil #SanjayRaut #UddhavThackeray #DevendraFadnavis #RahulGandhi #ChandrakantPatil #VeerSavarkar #SheetalMhatre #JitendraAwhad #SharadPawar #Maharashtra

Category

🗞
News

Recommended