• 2 days ago
Nira Canal : नीरा उजवा कालव्यात मृत कोंबड्या आढळल्यानं खळबळ,सावधगिरी बाळगण्याचं रामराजेंचं आवाहन 
दुष्काळी पट्ट्यातील गावांची तहान भागवणाऱ्या निरा उजव्या कालव्यामध्ये खंडाळा तालुक्यातील पिंपरी  गावाच्या हद्दीत मृत कोंबड्या वाहत असणारा व्हिडिओ विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी गुरुवारी आपल्या व्हाट्सअप स्टेटसला ठेवून नागरीकांनी सावधगिरी बाळगा असा सल्ला दिला होता..दरम्यान पिण्याच्या पाण्यात मृत कोंबड्या पडलेला व्हिडिओ पाहून या भागामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. मागील आठ दिवसापासून नीरा उजवा कालव्याचे उन्हाळी हंगामासाठीचे आवर्तन सुरू झाले असल्याने कालवा पूर्ण क्षमतेने वाहत आहे याचाच फायदा घेत अज्ञात इसमाने शेकडो मृत कोंबड्या कालव्याच्या पाण्यामध्ये टाकून दिल्यात. या जिल्हा पशुसंवर्धन विभागाने या घटनेची दखल घेतली असून नेमक्या कोंबड्या कशामुळे मृत झाल्या आणि त्या कालव्यात कशा आल्या याबाबत तपासून सुरू आहे..

Category

🗞
News

Recommended