Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
Mumbai | POP मूर्तींचे निर्माते आणि शाडू मातीचे मूर्तिकार एकमेकांना भिडले,पालिकेच्या बैठकीत हाणामारी
येत्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी मुंबई महापालिकेनं बोलावलेली मूर्तिकारांची बैठक हाणामारीनं गाजली प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे निर्माते आणि शाडू माती मूर्तिकार एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं. या बैठकीत पाण्याच्या बाटल्या आणि खुर्च्या एकमेकांवर फेकण्यात आल्या. त्यामुळं हा वाद अधिकच चिघळला. पीओपी मूर्तींविरोधात भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्याला बैठकीनंतर रस्त्यावर मारहाण करण्यात आली. शाडू मूर्तींसाठी लढा देणारे वसंत राजे या मारहाणीत जखमी झाले आहेत. या प्रकरणात त्यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं  प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घालण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबई महापालिका आणि पोलिसांनी यंदाच्या माघी गणेशोत्सवात त्याची अंमलबजावणी केली. ही बंदी भाद्रपद महिन्यातल्या गणेशोत्सवातही लागू राहणार आहे. त्या बंदीच्या अंमलबजावणीसाठी मुंबई महापालिकेनं आतापासूनच कंबर कसली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासनानं पर्यावरणपूरक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्यासाठी एफ दक्षिण कार्यालयात मूर्तिकारांची बैठक बोलावली होती.

Category

🗞
News
Transcript
00:00ब्रेक्नेंत्र बुलेटिन मदे पुना एक दस्वागत
00:30ब्रेक्नेंत्र बुलेटिन मदे पुना एक दस्वागत
01:00ब्रेक्नेंत्र बुलेटिन मदे पुना एक दस्वागत

Recommended