आता प्रत्येक घरात अँटी कोरोना पोलिस.!

  • 3 years ago
लातूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाहेर पोलिस अहोरात्र प्रयत्न करत आहेत. याच धर्तीवर प्रत्येक घरामध्ये `अॅंटी कोरोना पोलिस` (एसीपी) असायला हवा, असा आग्रह जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी धरला आहे. प्रत्येक घरात एक व्यक्ती एसीपी म्हणून ही जबाबदारी पाळेल व कुटुंबाचे संरक्षण करेल. बाहेर जाणाऱ्यांना तो जाब विचारेल. विनाकारण घराबाहेर जाण्यापासून रोखेल. गरज असेल तर मास्क व रूमाल घेण्यास सांगेल. बाहेरून आलेल्यांनी निर्जंतुकीकरणाची (सॅनिटायझर) काळजी घेतली आहे का, हेही तो विचारेल. घरातील प्रत्येक व्यक्ती शिंकताना व खोकताना पुरेशी काळजी घेतो का, सतत चेहऱ्याला हात तर लावत नाही ना, याची काळजी हा एसीपी घेईल. माझ्या घरात माझी मुलगी शाश्वती एसीपी आहे. तुमच्या घरात कोण? असा प्रश्न करत प्रत्येक घरातील हा एसीपी कोरोनाला पिटाळून लावेल, असा विश्वास जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी व्यक्त केला आहे.    

(व्हिडीओ : विकास गाढवे)
.
.
#latur #maharashtra #anticorona #coronavirus #coronavirusoutbreak #covid19 #coronainindia #coronavirusinmaharashtra #news #localnews #sakal #sakalnews #viral #viralnews #video #videos #viralvideo #viralvideos

Recommended