वड, पिंपळ, पिंपणी लावा...!

  • 3 years ago
वड, पिंपळ, पिंपरणी कुठेही उगवत असली तरी या वृक्षांचे संवर्धन कोणीही करत नाही. जिथे हे वृक्ष असतील तिथे एकतर ती नष्ट केली जातात किंवा दरवर्षी लाकूडफाट्यांसाठी फांद्यांची तोडणी केली जाते. ब्रिटीशांनी जिथे रस्ते केले. त्या रस्त्याशेजारी ब्रिटीशांनी वडाची झाडे लावली. आजही आपल्या जिल्ह्यातील अनेक रस्त्यांशेजारी हा वड, पिंपळ, पिंपरणी दिसते; पण ही झाडे आता झपाट्याने लुप्त होत आहेत. या वृक्षांचे संवर्धन प्रत्येकाने केले पाहिजे. जिल्ह्यातील कोणताही रस्ता घ्या. या रस्त्याशेजारी जी झाडे आहेत, ती आता कुठेतरी दिसतात. उन्हाळ्याच्या दिवसात वडाच्या झाड्याखाली कोणीतरी आग मुद्दामहून लावते. हळूहळू ही आग धुमसत अखंड वडाच्या झाडाला लागते. नंतर हा वड कोसळून खाली पडतो. वडाचे जतन झाले पाहिजे.

रिपोर्टर : अमोल सावंत
व्हिडीओ जर्नलिस्ट : मोहन मेस्त्री

Recommended