शरद पवार, कोकण आणि चक्रीवादळ...

  • 3 years ago
निसर्ग चक्रीवादाळाने रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतीवर आधारीत अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला. कोरोनाच्या काळातच हे संकट कोसळले. यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोकण दौरे केले; पण सगळ्यात जास्त लक्षवेधी ठरला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांचा दौरा. इतक्या वयात आणि कोरोनाचा संसर्ग कोकणात वाढत असतानाही पवार यांनी केलेला हा दौरा त्यांचे कोकणशी, इथल्या मातीशी, कोकणी माणसाशी असलेले घट्ट नाते सांगायला पुरेसा आहे; पण या वादळाने केलेल्या नुकसानाचे स्वरूप सरकारी पंचनाम्यात, आणि नुकसानीच्या आकड्यात मावणारे नाही. हा ‘जाणता नेता’ पुन्हा एकदा कोकणच्या कृषीक्षेत्राचा तारणहार ठरणार का हा कोकणवासियांना पडलेला प्रश्‍न आहे. या दराचा आढावा घेतला आहे शिवप्रसाद देसाई यांनी...

#sakal #news #viral #sakalnews #marathinews #kokan #kolanvideo #shardpawar #devendrfadnvi #nisarg #hurricanes

Recommended