KolhapurNews | कोल्हापुरात चिनी वस्तूंवर बहिष्काराच्या आंदोलनाला धार आली आहे.

  • 3 years ago
कोल्हापूर - काल विविध ठिकाणी वस्तूंवर बहिष्कासाठी आंदोलने करण्यात आली. गेल्या दोन दिवसापासून राजकीय पक्षांनी ही यात उडी घेतली आहे. भारतीय सीमेवरील गलवान येथे भारतीय सैन्यावर हल्ला व कोरूना च्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात येत आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स नवी दिल्ली यांच्या भारतीय सामान हमारा अभिमान आणि चिनी वस्तूंवर बहिष्कार या देशव्यापी अभियानाची सुरुवात कोल्हापुरातून आज झाली. आमदार चंद्रकांत जाधव सीआयटी चे उपाध्यक्ष धैर्यशील पाटील संघटन सचिव ललित गांधी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे अध्यक्ष संजय शेटे यांच्या अध्यक्षतेखाली या अभियानाचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून झाला. युवा सेने तर्फे ही चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत दुकानदारांना आम्ही चायनीज वस्तू विकत नाही तुम्ही चायनीज वस्तू वापरू नका असे प्रबोधनात्मक पत्रकांचे वाटप केले. तसेच भारतीय सीमेवर हल्ला करणाऱ्या चीनच्या विरोधात राजारामपुरी जनता बाजार चौक येथे आदित्य भोसले युवा मंचतर्फे चिनी वस्तूंचा बहिष्कार करण्यात आला.

व्हिडिओ : मोहन मेस्त्री

Recommended