क्षण बहराचे :अवघ्या कुटुंबाची जडली आहे पर्यावरणाशी मैत्री | Sakal Media |

  • 3 years ago
क्षण बहराचे :अवघ्या कुटुंबाची जडली आहे पर्यावरणाशी मैत्री
मयूर भावे यांच्या अवघ्या कुटुंबाचीच पर्यावरणाशी मैत्री जडली आहे. त्यांच्या पत्नी सुजाता, मुली ऋजुता व सुखदा तसंच आई-बाबा सुद्धा दैनंदिन जगण्यात पावलोपावली पर्यावरणाचं हित पाहतात. स्वतःच्या घर व परिसरातील ओल्या कचऱ्याचं कंपोस्ट खत करणं, शेजारच्यांच्या घरातीलही वाया जाणाऱ्या अन्नपदार्थांचं व्यवस्थापन बायोगॅससाठी करणं, सोसायटीत कुणाकडे समारंभ असल्यास त्यांना प्लॅस्टिक व थर्माकोलचा वापर टाळायचं आवाहन करत आपल्या घरातील स्टीलची भांडी पुरवणं यांसारख्या एक ना अनेक गोष्टी ते करतात. स्वप्नवत वाटावी, पण आपल्यालाही सहज आत्मसात करता येईल, अशी ही जीवनशैली जाणून घेऊ या.
( नीला शर्मा)
#Sakal #SakalNews #MarathiNews #Pune #MayurBhave #SakalVideo

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended