मनसेकडून कोल्हापूर महापालिकेच्या कारभाराची वरात | Sakal Media |

  • 3 years ago
कोल्हापूर : शहरातील पाणी पुरवठा पाईपलाईन बदलण्यासाठी शासनाने सुमारे 115 कोटी रुपयांचा ठेका दिला आहे. या क ामाचा ठेकेदार दास आणि कंपनीने शहरात खूदाई सुरू केली आहे. हे खूदाई काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत मनसेचे जिल्हाअध्यक्ष राजू जाधव यांच्या नेतृत्वाखाली वाळू, सिमेंट आणि मातीचा आहेर करण्यासाठी महापालिकेला प्रतिकात्मक रुखवत सादर करण्यासाठी अनोखा मोर्चा काढण्यात आला. बॅंडच्या तालावर, घोडेस्वार आणि शानदार बग्गीतून हा रूखवत आणला होता. मोर्चा महापालिकेसमोर आल्यानंतर संपुर्ण रुखवत मुख्य दरवाजासमोर मांडून निदर्शने करण्यात आली. पाईप लाईनची खूदाई करुन ती खुदाई मुजवून डांबरीकरण केलेले नाही. हे काम निकृष्ठ असल्याची आयुकतांकडे पुराव्यासह तक्रार करुनही त्याची दखल घेतली नसल्याचा निषेध करण्यात आला आणि या कंपनीला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याची मागणी करण्यात आली.
व्हिडीओ जर्नालिस्ट : मोहन मेस्त्री

Recommended