मन हेलावून टाकणारे काम! केवळ पोटासाठी ... | Sakal Media |

  • 3 years ago
नागपूर : पोटाची खळगी भरण्यासाठी माणसाला कधी काय करावे लागेल, याचा नेम नाही. कधी कुणी रस्त्यावर फेकलेले शिळे व उष्टे अन्न खाताना दिसतो, तर कुणी सडका भाजीपाला गोळा करून आपल्या मुलाबाळांच्या पोटात दोन घास टाकतो. असेच काहीसे हृदय हेलावून टाकणारे चित्र नुकतेच कळमना मार्केट परिसरात पाहायला मिळाले. येथे व्यापाऱ्यांनी खराब झालेले कांदे, आलू व टमाटर रस्त्यावर फेकून दिल्यानंतर गोरगरीब महिलांनी लगेच तिकडे धाव घेत, त्यातल्या चांगल्या खाण्यायोग्य वस्तू गोळा करून आपल्या पिशवीत भरल्या. अनेकांसाठी हे पदार्थ सडके व टाकाऊ असले तरी, त्यामुळे गोरगरिबांची भूक भागते, हेही तितकेच खरे. समाजात आज एकीकडे श्रीमंती, मौजमजा दिसत असली तरी, दुसरीकडे उपाशीपोटी रात्र काढणारेही आहेत. दुर्दैवाने हेच आजचे वास्तव आहे. (व्हिडिओ : प्रतीक बारसागडे)
#Nagpur #PoorPeople #SakalNews

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended