महिला गुळव्या, गुळाच्या इंजिनिअर कांचन गोटूरे यांची कहाणी | Kolhapur | Sakal Media |

  • 3 years ago
उसाचा रस काहिलीत टाकला की तिचं काम सुरु होतं. रसातील मळी काढण्यापासून ते चुलवाणीच्या जाळाकडे क्षणांक्षणाला नजर, उकळणाऱ्या रसाचा रंग जस-जसा बदलत जातो तस-तसे तिचे लक्ष बदलणाऱ्या रसाकडे खिळून रहातं..तोंडावर येणाऱ्या वाफेच्या झळांची पर्वा न करता रसातला " गुळ " शोधण्यासाठी तिची सर्व शक्ती एकवटली जाते. हातातील फावड्याची जलद हालचाल करत काहीलीतच रसाची उधळण करण्याचे काम अव्याहत सुरु होते. कारण काहिलीतील रस उखळताना उतू येवू नये म्हणून हे करता-करता एका तिक्ष्ण क्षणी रसातील गुळ "नजरेने" च पकडला जातो. जाळ थांबवा असा आपसुक आदेशच दिला जातो. आणि क्षणाचाही वेळ न दवडता रस गुळ करण्यासाठी वाफ्यात ओतला जातो. त्याक्षणी इतक्‍या वेळ असणारा दबाव काही क्षण दूर होतो. आणि तयार होणारा मऊ सूत गुळ महिला गुळव्याचा गोडवा वाढवतो आहे .
( व्हिडिओ स्टोरी व एडिटिंग बी.डी.चेचर )
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended