पिंपरी-चिंचवड शहरातील काँग्रेसचा शेवटचा बुरुजही ढासळला

  • 3 years ago
पिंपरी चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून काँग्रेस मध्ये सुरू असणारी खदखद अखेर बाहेर पडली आहे. पक्ष श्रेष्टीचे पिंपरी चिंचवड शहरात लक्ष नसल्याने आणि त्यामुळे शहर काँग्रेस रसातळाला गेल्याने नाराज होऊन पिंपरी चिंचवड शहराचे काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी राजीनामा दिला आहे. आता शहर काँग्रेसचा शेवटचा बुरुज देखील ढासळला असल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे. पिंपरी-चिंचवड शहरात युवक काँग्रेस पासून गेले चाळीस वर्ष काँग्रेसचे काम करणारे सचिन साठे यांना दहा वर्षापूर्वी पक्षाने अध्यक्ष पद देण्यात आले होते.मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला पक्षाचा नाही असे त्यांनी मत व्यक्त केले. शिक्षण मंत्री रामकृष्ण मोरे यांनी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस वाढविण्यासाठी प्रयत्न केला त्यानंतर अजित पवार यांनी सूत्रे हातात घेऊन तिथे कॉंग्रेस वाढवण्याचे प्रयत्न केला मात्र राष्ट्रवादीचा उदय झाल्यानंतर शहराकडे वरिष्ठांचे कुणाचेही लक्ष दिले नाही. लोकसभा विधानसभा महापालिकेची निवडणूक आल्या तरीही शहराकडे कोणीही वरिष्ठ लक्ष देत नाही. यानंतर या शहरात औषधालाही कार्यकर्ता शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती आहे, असे साठे यांनी सांगितले.

Recommended