एकीकडे आधीच शेतकरी संकटात आहे. त्यात लॉकडाऊन मूळे शेतकरीं पूरता डबघाईला आलेला असतानाच आता रासायनिक खतांच्या किंमती प्रचंड वाढल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन संकट आल आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या खत भाववाढीच्या निषेधार्थ राज्यमंत्री बच्चू कडू आता आक्रमक झाले असून येत्या 20 तारखेला राज्यमंत्री बच्चू कडू हे ताली बजाव-थाळी बजाओ आंदोलन करणार आहे. रासायनिक खतांचे वाढलेले भाव तातडीने कमी करण्याची मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. वीस तारखेला सायंकाळी सहा वाजता आपल्या घरीच प्रत्येक शेतकऱ्याने हे आंदोलन करण्याचे आवाहनही राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केले आहे. तसेच तूर, मूग, उडीद या कडधान्याची आयात थांबवण्याची मागणी बच्चू कडू यांनी सरकारकडे केलेली आहे. खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच आता काही दिवसांपूर्वीच या वर्षीच्या रासायनिक खतांचे दर घोषित करण्यात आले आहे. या वाढत्या खतांच्या किमती मुळे शेतकऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे.
#Bacchukadu #Fertilizer #Farmer #Maharashtra #NarendraModi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics

Category
🗞
News