• 3 years ago
काँग्रेसचे खासदार राजू सातव यांच्या निधनाबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. राज्यातील राजकारणातील उमदे नेतृत्व हरविले असल्याचे ते म्हणाले. आम्ही विधानसभेत एकत्र काम केलं आहे. आमची चांगली घनिष्ठ मैत्री होती. त्यांनी देखील ती जपली होती. अशा प्रकारचा नेता की महाराष्ट्राची जाण होती, इथल्या प्रश्नांची जाण होती, त्यांच्या पक्षामध्ये त्यांना मोठे स्थान होते. त्यांच्या प्रकृतीबद्दल कळले होते. एक चांगला मित्र, उमदा राजकारणी हरविला आहे. त्यांच्या निधनाबद्दल अतिशय दुःख झाले आहे. ते सत्ताधारी पक्षातील नेते होते. विधानसभेत ते प्रश्न मांडत होते.ते प्रश्न शेवटपर्यंत नेट होते. अनेकवेळा ते भेटले की या प्रश्नामध्ये अनेकवेळा माझी मदत घ्यायचे. विरोधक म्हणून आम्ही त्यांना जनहिताच्या प्रश्नासाठी आम्ही त्यांना साथ देत असू, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनाबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
#rajivsatav #death #devendrafadanvis #akola #maharashtra
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended