• 3 years ago
कितीही वैर असले तरी संकट काळात ते बाजूला ठेवून मदतीला धावून जाणे हिच खरी माणूसकी. याचा प्रत्यय तौत्के वादळात उडालेल्या हाहाःकारात आला आचरा, पारवाडी, डोंगरेवाडी (जि. सिंधुदर्ग) येथील कोळंबी प्रकल्पामुळे या भागातील जमीन, विहीरींचे पाणी क्षारपड होण्याबरोबरच या प्रकल्पामुळे पूरस्थिती उद्भवण्याचा धोका होवू शकतो. या कारणास्तव या भागातून जोरदार विरोध केला जात आहे. याबाबत प्रकल्प विरोधी समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तक्रारी दाखल करून दाद मागितली जात आहे . पण असे असतानाही रविवारी उधाणाचे पाणी या प्रकल्पात अकस्मात शिरले. त्यात प्रकल्पाचे कामगार अडकल्याचे समजताच प्रकल्प विरोधी समितीच्या मंडळींनी त्यांना दोरांच्या साह्याने सुखरूप बाहेर काढले. आपले वैर प्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानीशीच आहे. काम करणाऱ्या लोकांशी नसल्याचा प्रत्यय देत प्रकल्प विरोधी लोकांनी दाखवलेल्या माणूसकीतून तीन लोकांना धोकादायक स्थितीतून बाहेर काढले गेले. त्यांच्या या तत्परतेचे कौतुक होत आहे.
#Humanity #Sindhudurg #CycloneTauktae #konkan

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended