शासकीय केंद्रावर तुटवडा असणारी कोरोना लस भाजप आमदारांना कशी मिळते! - संजय निरुपम |Sarkarnama|

  • 3 years ago
मुंबई : मुंबईमध्ये कोरोना लसीकरणाच्या (corona vaccination) नावावर नवीन धंदा सुरु झाला आहे. बाजाराची जुनी परंपरा आहे, कुठल्याही मालाची कृत्रिम टंचाई निर्माण करायची आणि नंतर ते जास्त किंमतीत विकायचे. तोच प्रकार कोरोना लसीकरणासंदर्भातही सुरु आहे, असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे.

निरुपम यांनी या संदर्भात एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले की ''मुंबईमध्ये 150 आणि 250 रुपयांच्या कोरोना लशीसाठी 1000 रुपये घेतले जात आहेत. खासगी रुग्णाल्यांमध्ये लस मिळत आहे. त्याच्या सोबत भारतीय जनता पक्षाचे काही आमदार लसीकरण अभियान सुरु करत आहेत. जर कोरोना लशीची टंचाई आहे, तर भाजपचे आमदार आणि खासगी रुग्णालयांना लस कुठून उपलब्ध होत आहे'', असा सवाल निरुपम यांनी केला आहे.
#maharashtra #sarkarnama #bjp #vaccine #corona

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Recommended