• 3 years ago
बेबडओहळ (जि. पुणे) : नमस्कार, कसं काय ठीक आहे का.... हो ठीक आहे....आता पहिले हे सांगा, आपण शेतात कोणत्या नवीन गोष्टी करता, ज्या ऐकून देशातील जनतेला त्या चांगल्या वाटतील. हा संवाद आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील आढले बुद्रूक येथील शेतकरी बाळू नथू वाघमारे यांच्यामधील. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधण्याची संधी बाळू वाघमारे यांना मिळाली. आंबी येथील नोबेल एक्सचेंज या जैविक खताच्या केंद्राने त्यांना ही संधी प्राप्त करून दिली. शेतीत वापरलेले नवीन तंत्रज्ञान व प्रयोगांबाबत मोदी यांनी वाघमारे यांना बोलते केले. कसं काय बरं आहे का, अशी मराठीतून विचारणा करत त्यांनी संवादाला सुरवात केली.
#sarkarnama #modi #pmmodi #maharashtra #bebedhol # Modimarathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended