• 3 years ago
ओबीसी आरक्षणाकरीता भाजपा ओबीसी मोर्चाचे आक्रोश आंदोलन
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

अँकर : आरक्षण आमच्या हक्काचं... उठ ओबीसी जागा हो एकजुटीचा धागा हो... ओबीसी के सन्मान मे भाजपा मैदान में... अशा घोषणा देत भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहर तर्फे आंदोलन करण्यात आले.
महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत केलेल्या हलगर्जीपणाच्या विरोधात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहरतर्फे आक्रोश आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. आहे. भाजपा ओबीसी मोर्चा पुणे शहरचे अध्यक्ष योगेश पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणा-या अतिरिक्त राजकीय आरक्षणासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे ओबीसींना मिळणारे अतिरिक्त राजकीय आरक्षण संपुष्टात आले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर देखील महाविकास आघाडी सरकार बाजू मांडण्यास अपयशी ठरले असून ओबीसी आरक्षणाबाबतही तीच स्थिती झाली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन काही नेतेमंडळी महाराष्ट्रातील जनतेची धूळफेक करीत आहेत. मात्र, ओबीसी समाज त्यांच्या या धोरणांना चांगलेच ओळखून आहे. त्यामुळे आता यापुढे ओबीसी समाज शांत बसणार नाही. महाविकास आघाडी, ठाकरे सरकारने जनतेची दिशाभूल केली असून त्याविरोधात भाजपा पुणे शहर ओबीसी मोर्चा आक्रोश आंदोलन करीत आहे.यावेळी आंदोलन कर्त्या बरोबर बातचित केली आहे सागर आव्हाड यांनी


भाजप आंदोलन चौपाल

#OBCreservation #BJP #aandolan #pune

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended