गं पोरी पिंगा, गं पोरी पिंगा...

  • 3 years ago
Kolhapur : गं पोरी पिंगा, गं पोरी पिंगा...

Kolhapur : गणरायाचे आगमण म्हणजे आनंदोत्सव. या गणरायाच्या पाच दिवसांच्या सुट्टीसाठी आपण प्रत्येकजण त्याचा थाटामाटात प्रतिष्ठापणा, पूजा करतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेली दोन वर्ष गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा झाला. गणेशाच्या आगमणानंतर तिसऱ्या म्हणजे आजच्या दिवशी गौरीचे आगमण होते. आजच्या दिवशा गौराई आपल्या माहेरी येते. तिला भाजी-भाकरीचा नैवेद्य चढवला जातो. यादरम्या तिच्या आवडत्या खेळांची, गीतांची मैफील महिला मंडळाच भरते. अनेक गीते म्हणून दोन दिवस तिच्या सेवेत महिलावर्ग व्यस्त असतो. कोल्हापुरातही गल्लोगल्ली ही परंपरा आजही जपली जाते. गौरीच्या गीते, झिम्मा-फुगडीची, काटवटकान्याची, पिंग्याची ही रात्र महिलावर्गच्या आनंदाची पर्वणी ठरणारी म्हटंले तर वावगे ठरणार नाही. याच गौरीच्या आवहन दिवशीचा ही झिम्मा-फुगडी..

Video : Archana Banage & Snehal Kadam


#GauriGanpati #ganeshfestival #kolhapur

Category

🗞
News

Recommended