Jalna: घनसावंगीत ऊसतोड वाहतूकदारांचा ट्रॅक्टर मोर्चा
- 3 years ago
घनसावंगी (जि.जालना) : ऊसवाहतुकीचे वाहतूक दर आणि कमिशन वाढवून मिळवून देण्यात यावे, या मागणी करिता ऊस वाहतूकदार संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष अतूल खुपसे यांच्या नेतृत्वाखाली घनसावंगी येथे सोमवारी ( ता.चार ) नवीन बसस्थानक ते तहसील कार्यालयापर्यत ट्रॅक्टर मोर्चा काढून मागण्याकडे लक्ष वेधण्यात आले. तीन वर्षाला ऊसतोडणी भाववाढ केली नाही तर ऊसतोडणीधारक संप करतात. त्या धर्तीवर ऊस वाहतूकदारांना तीन वर्षाला दरवाढ (टायर किंमत, ड्रॉयव्हर पगार, कोयता मजूर) यांची झालेली वाढ यांचा विचार करता डिझेल दर गेल्या पाच वर्षापूर्वी 64 रूपये इतका होता आता शंभर रूपयाच्या आसपास झालेला आहे. डिझेलच्या पटीत पन्नास टक्के दरवाढ झाली पाहिजे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. (व्हिडिओ - सुभाष बिडे)
#jalna #jalnanews #ghansawangi #ghansawanginews #farmerstractorrally #tractorrally
#jalna #jalnanews #ghansawangi #ghansawanginews #farmerstractorrally #tractorrally