Satara: 'रयत'चा पदसिद्ध अध्‍यक्ष मुख्‍यमंत्री हवा; उदयनराजेंचं थेट पवारांना आव्हान

  • 3 years ago
#satara #udayanrajebhosale #sumitrarajebhosale #sharadpawar #ajitpawar
सातारा : रयत शिक्षण संस्‍थेस त्या वेळी राजमाता सुमित्राराजे भोसले (Rajmata Sumitraraje Bhosle) व राजघराण्‍यातील इतर व्यक्तींनी वेळोवेळी मदत केली आहे. अलीकडे रयतचा अर्थ बदलत चालला असून, याठिकाणी होणाऱ्या मर्जीनुसारच्‍या नेमणुका धोकादायक आहेत. रयत एका कुटुंबाभोवती केंद्रित होत चालली आहे. रयतचा पदसिद्ध अध्‍यक्ष हा राज्‍याचा मुख्‍यमंत्री असावा, असे घटनेत कर्मवीरांनी नमूद केले होते. त्‍यानुसार सध्‍याचे मुख्‍यमंत्रीच रयतचे अध्‍यक्ष असणे आवश्‍‍यक असल्‍याचे सांगत आज खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्‍यावर टीका केली. (व्हिडिओ : प्रमोद इंगळे)

Recommended