• 3 years ago
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून पुणे जिल्ह्यातील दोन गुन्हेगारांचा यात समावेश आहे. याबाबत आंबेगाव तालुक्यातील संतोष जाधव या सराईत गुन्हेगाराचे नाव आले असून दुसरा गुन्हेगार हा मावळ परिसरातील सौरभ महाकाळ असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. संतोष जाधव हा आंबेगाव तालुक्यातील पोखरी येथे राहत असून त्याचा या हत्याकांडात समावेश असल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिसांनी संतोष आणि सौरभ या दोघांविरोधात लुक आउट नोटीस जारी केली आहे.

#SidhuMooseWala #Pune #SaurabhMahakal #SantoshJadhav #Haryana #Punjab #AAP #Congress #MOCA #Police #Investigation #CarIncident #Shootout #Sharpshooter

Category

🗞
News

Recommended