केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला असून केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी 8 लाख मे टन साखर निर्यातीला मुदतवाढ दिलीय. राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांनी या संदर्भात मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. साखरेला 8 लाख मे टन निर्यात करण्याचा कोटा वाढवून देण्याची मागणी केली होती. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी मंत्री पियुष गोयल यांना साखर निर्यातीबाबत कारखानदारांना दिलासा देण्याची विनंती केली होती. महाडिक यांनी मंत्री गोयल यांना याबाबत एक निवेदन दिले, ज्यात म्हटलंय की, Open General Licence (OGL) अंतर्गत अनेक साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी पाठविलेली साखर बंदरांपर्यंत पोहोचली आहे.
Category
🗞
News