• 2 years ago
गुजराती आणि राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानीच राहणार नाही, या वक्तव्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी केलेल्या विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय. खरंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण या निमित्ताने काढली जातेय. कारण स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे इ. स. १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. पण राज्यपालांनी केलेल्या या एका वक्तव्यामुळे मात्र महाराष्ट्रातील तत्कालीन किंवा सध्यस्थितीतील नेत्यांवर किंवा नेतृत्वावर बोट उचललं गेलं, अशा प्रतिक्रिया आता येऊ लागल्या आहेत.


#BhagatSinghKoshyari #Governor #Maharashtra #Rajyapal #ControversialStatement #SamyuktaMaharashtraMovement #Gujarat #Marathi #Rajasthan #Mumbai #HWNews

Category

🗞
News

Recommended