• 3 years ago
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. शिवसेनेतून बंड केल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात भेट झाली. राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही नेते भेटले आणि यावेळी एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंच्या प्रकृतीचीही विचारपूस केली. राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरेंसोबत राजकीय नाही तर, सदिच्छा भेट झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली.

Category

🗞
News

Recommended