• 3 years ago
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण मोठ्या प्रमाणात तापलं असून शिंदे गट आणि ठाकरे गट यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. नेमकी शिवसेना कोणाची यावरून मोठा वाद निर्माण झालाय. खरे शिवसैनिक आम्हीच हे दाखवण्यासाठी दोन्ही गटातील कार्यकर्ते वेगवेगळ्या माध्यमातून आपली निष्ठा दाखवत आहेत. अशाच प्रकारे कल्याणमधील ठाकरे गटातील पदाधिकारी विजय साळवी यांच्या विजय तरुण मंडळाने यंदा गेल्या तीन महिन्यात शिवसेनेत ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्या घडामोडींवर आधारित 'पक्ष निष्ठा' या विषयावर चलचित्र देखावा साकारला.

#Ganeshotsav #EknathShinde #UddhavThackeray #Kalyan #ShivSena #BJP #KDMC #MumbaiPolice #Maharashtra #HWNews

Category

🗞
News

Recommended