• 2 years ago
ठाकरे गटाच्या शिवसेनेला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे दिसत आहे. आज शेकडो शिवसैनिकांसह नेत्यांनी शिवतीर्थीवरील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जात बाळासाहेबांना अभिवादन केले. त्यानंतर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या, या स्मृतीस्थळावरील मशाल कायम धगधगती राहील. नियतीच्या मनात काय होते माहित नाही. मात्र, तेच चिन्ह मिळणे हा गद्दारांना एक इशारा आहे.

#KishoriPednekar #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #ECI #ElectionCommission #Maharashtra #Mashal #Symbol #ShivajiPark

Category

🗞
News

Recommended