• 2 years ago
दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या ट्वीटची चर्चा रंगली होती. "सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर मनसैनिकांनी भाष्य करू नये" असं राज ठाकरे यांनी म्हंटलं. ज्यामुळे उद्धव ठाकरे आणि मनसेची युती होणार का अशा चर्चा लगेचच सुरू झाल्या. पण मंगळवारी राज ठाकरे यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने स्वबळाचा नारा देत तयारीला लागण्याचे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले आहेत.

#MNS #RajThackeray #UddhavThackeray #ShivSena #Symbol #EknathShinde #Maharashtra #BMCElection #MaharashtraNavnirmanSena #BJP #Mumbai #HWNews

Category

🗞
News

Recommended