• 2 years ago
आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. विधानसभा निवडणुकांना बराच कालावधी आहे. पण सध्या राज्यातलं राजकारण पाहता आतापासूनच प्रत्येक पक्ष प्रत्येक मतदारसंघातून पडताळणी करताना सध्या दिसून येत आहे. अशातच रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटातील उदय सामंत यांच्याविरोधात आमदार राजन साळवी यांना उभं करून उदय सामंतांसामोर तगडं आव्हान उभं करण्याच्या तयारीत ठाकरे गट असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

#RajanSalvi #UddhavThackeray #UdaySamant #EknathShinde #Ratnagiri #VidhanSabhaElection2022 #LoksabhaElection #ShivSena #Maharashtra #Sangameshwar #BJP #NCP #Rajapur

Category

🗞
News

Recommended