• 3 years ago
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बेळगावात येवू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशारा महाराष्ट्रातील मंत्र्यांना दिला होता. त्यानंतर उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आपण बेळगावात जावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करणार असल्याचे जाहीर केले आहे. तर आता शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी देखील पक्षाने आदेश दिल्यास बेळगावात गनिमी काव्याने घुसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करू असा सूचक इशारा कर्नाटक सरकारला दिला आहे.

#ShahajiBapuPatil #Belgaon #KarnatakaGovernment #Shivsena #BalasahebanchiShivsena #Sangola #MaharashtraKarnatakaBorder #ChhatrapatiShivajiMaharaj #Politics #hwnewsmarathi

Category

🗞
News

Recommended