• 2 years ago
कामोठे येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिमा असलेली तब्बल ४० हजार स्क्वेअर फुटांची रांगोळी साकारण्यात आलेली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसनिमित्त त्यांची प्रतिमा असलेली रांगोळी कामोठे मधील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेच्या पटांगणात साकारली आहे. ही महाकाय रांगोळी साकारण्यासाठी तब्बल नऊ टन रांगोळी लागली आहे. तर पाच दिवसांमध्ये कलाकारांनी हि रांगोळी साकारली आहे. ही रांगोळी नावडे येथील प.जो.म्हात्रे विद्यालयातील कला शिक्षक मंगेश खुटारकर, चेतन भोईर, रमेश खुटारकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मेहनतीने साकारली गेली आहे.

#sharadpawar #ncp #rangoli #kamothe #viralphoto #birthday #hwnewsmarathi

Category

🗞
News

Recommended