राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. या अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. कोरोनामुळे दोन वर्षानंतर होणाऱ्या या अधिवेशनात अनेक मोठ्या मुद्द्यांवर चर्चा होत आहे. आता शिंदे गट आणि भाजपने ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक धक्कादायक आरोप करण्यात येत आहेत. शिंदे गटाच्या आमदारांनी आज दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत चौकशीची मागणी केली. यानंतर आमदार नितेश राणे यांनी देखील आक्रमक होत चौकशीची मागणी केली.
#DishaSalian #NiteshRane #AdityaThackeray #SushantSinghRajput #Bollywood #DrugsCase #WinterSession #NarayanRane #DevendraFadnavis #ShivSena #BJP #Maharashtra #Nagpur #Vidhansabha #HWNews
#DishaSalian #NiteshRane #AdityaThackeray #SushantSinghRajput #Bollywood #DrugsCase #WinterSession #NarayanRane #DevendraFadnavis #ShivSena #BJP #Maharashtra #Nagpur #Vidhansabha #HWNews
Category
🗞
News