लंडनमधील पॅडिंग्टन या ऐतिहासिक रेल्वे स्टेशनवर इंग्लंडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून स्थायिक असलेल्या मराठी ख्रिश्चन मंडळींनी ख्रिसमस कॅरल्सचे आयोजन केलंय. गेल्या ४ वर्षांपासून प्रशांत आणि माधुरी कुलकर्णी यांच्याकडून या उपक्रमाचं आयोजन केलं जातं. या ठिकाणी लंडनशिवाय मँचेस्टर, बर्मिंगहॅम, ब्रिस्टल, स्विंडन या शहरांमधून हे सर्व जण एकत्र येतात. महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेली आणि अनेक वर्षांपासून इंग्लंडमध्ये स्थायिक झालेली ही मंडळी मोठ्या आनंदात हा सण साजरा करतात आणि हा सण, नव्या वर्षाचा आनंद भरभरून जगतात.
Category
🗞
News