फॅन्ड्री, सैराट फेम नागराज मंजुळे निर्मित घर बंदूक बिर्याणी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचं शूट पूर्ण झालं. तरी, हेमंत अवताडे दिग्दर्शित चित्रपटात आकाश ठोसर, सयाजी शिंदे, नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत आहेत. एकाच वेळी हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. टीजर पाहता पोलीस आणि डाकूंची चकमक यात दिसतेय पण ती नेमकी कशासाठी आहे हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
Category
🗞
News