• 2 years ago
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत काँग्रेस पक्षात घडलेल्या घडामोडींनी व्यथित झाल्याने थोरात यांनी राजीनामा दिलाय. पण पक्षश्रेष्ठी बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा स्वीकारणार का? असा प्रश्न आहे.

#balasahebthorat #nanapatole #satyajeettambe #congress #rahulgandhi #soniagandhi #sangamner #NashikMLC #GraduateConstituency #maharashtra #hwnewsmarathi

Category

🗞
News

Recommended