Earthquake in Turkey: भारताकडून NDRF ची तिसरी तुकडी टर्कीच्या मदतीसाठी रवाना

  • last year
भारताकडून भूकंपग्रस्त टर्कीसाठी आवश्यक मदत पोहोचवण्याचं काम सुरूच आहे. ८ फेब्रुवारीला भारताने NDRF ची तिसरी तुकडी टर्कीला पाठवली. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील हिंडन विमानतळावरून भारतीय हवाई दलाच्या C17 विमानावरून ही मदत पाठवण्यात आली आहे. यामध्ये श्वान पथक, बचाव कार्यासाठी वाहनं पाठवण्यात आली आहेत. यावेळी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री वी. मुरलीधरन तसेच भारतातील तुर्कीचे राजदूत फिरत सुनेल हे देखील उपस्थित होते.

Recommended