• last year
दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसवल्यामुळे आज महाराष्ट्राची अधोगती सुरू आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. आज मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. तसंच महाराष्ट्रात शिवसेनेशी लढतानाही मोदी एकटे नव्हते, तर राज्यपाल कोश्यारी त्यांच्या ‘गोल्डन गँग’चे सदस्य होते. या ‘गोल्डन गँग’च्या सदस्यांना लाभाची पदं आणि आमिषं देऊन लढाईला उतरवणं ही काही मर्दुमकी नाही, असा हल्लाबोल राऊत यांनी मोदी सरकारवर केला.

#SanjayRaut #BhagatSinghKoshyari #Shivsena #PMModi #BJP #EknathShinde #DevendraFadnavis #GoldenGang #Mumbai #Maharashtra #UddhavThackeray

Category

🗞
News

Recommended