• last year
कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आमदार सत्यजित तांबे यांना पक्षात पुन्हा सक्रिय होण्याची साद घातल्यानंतर त्यजित तांबे यांनी 'उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी..... घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी', असं ट्विट करून खळबळ उडवून दिली. सत्यजीत तांबे यांच्या या ट्विटचे राजकीय वर्तुळात निरनिराळे अर्थ काढले जात होते. त्यामुळे आता सत्यजित यांनी आपल्या ट्वीटबद्दल स्पष्टीकरण दिलंय. माझ्या व्टिट चा वेगळा अर्थ काढण्याची गरज नसल्याचं प्रतिपादन सत्यजित तांबे यांनी केलंय. एकूणच माझा सध्या आभार दौरा हा नाशिक पदवीधर मतदारसंघात सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्याला काम करायची गरज असल्याचे देखील सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केलं आहे.


#SatyajeetTambe #Congress #BalasahebThorat #NanaPatole #INC #RahulGandhi #SoniaGandhi #Sangamner #NashikMLC #GraduateConstituency #Maharashtra

Category

🗞
News

Recommended