महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी उद्यावर गेली आहे. सुप्रीम कोर्टात उद्या शिंदे गटाचे वकील युक्तीवाद करणार आहेत. त्यानंतर सुनावणी होईल. त्यामुळे सत्तासंघर्षाचं प्रकरण सध्याच्या घटनापीठासमोर राहणार की सात न्यायमुर्तींच्या घटनापीठाकडे जाणार हे उद्याच ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकिल हरीश साळवे यांनी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार कोसळण्याला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जबाबदार ठरवलंय. हरीश साळवे यांनी आपल्या युक्तीवादात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यावर जोर दिला.
#UddhavThackeray #SharadPawar #EknathShinde #MahavikasAaghadi #Shivsena #BJP #DevendraFadnavis #NCP #JayantPatil #Maharashtra #MVA
#UddhavThackeray #SharadPawar #EknathShinde #MahavikasAaghadi #Shivsena #BJP #DevendraFadnavis #NCP #JayantPatil #Maharashtra #MVA
Category
🗞
News