• last year
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सोयबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली होती. याचे राज्यभरात पडसाद उमटले होते. पण, मंत्री गुलाबराव पाटील यांनी या आंदोलनाला नौटंकी म्हटलं होतं. “शेतकऱ्यांचं हे आंदोलन नौटंकी आंदोलन आहे. हे नौटंकी आंदोलन आपल्याला पसंत नाही,” अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली होती. त्यांच्या विधानाचा आता रविकांत तुपकर यांनी समाचार घेतला आहे. “गुलाबराव पाटील आंदोलनाला नौटंकी म्हणत आहे. पण, गुलाबराव पाटीलांच्या भाषणात एक डायलॉग असतो, तो म्हणजे, ‘कतलीया कही कात बदल लेते हे, पुण्य के आड मे पाप बदलते है, पर कई लोग अपने बाप बदल लेते है’ अन् गुलाबराव पाटील गुवाहाटीला गेले. ते सांगतात मी नौटंकी आहे. मग गुवाहाटीला काय शेण खायला गेले होते का?,” असा खोचक सवाल रविकांत तुपकर यांनी विचारला.

#RavikantTupkar #SwabhimaniShetkari #GulabraoPatil #Shivsena #UddhavThackeray #Cotton #Soyabean #Farmers #Maharashtra #Farming #Buldhana #Akola #EknathShinde #Guwahati #Rebel #ShetkariAndolan

Category

🗞
News

Recommended