शुक्रवारी धनुष्यबाण आणि शिवसेनेबाबत निवडणूक आयोगानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्यात आलं आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळताच आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर शिंदे गटासाठी पुन्हा एक गुड न्यूज मिळण्याची शक्यता सुद्धा आहे. केंद्रातील मोदी सरकारमध्ये शिंदे गटाला स्थान मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
Category
🗞
News