ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी पोलीस आयुक्त आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून आपल्या जिवाला धोका असल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांची सुपारी दिल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. तर देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांच्या आरोपांना सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले. दरम्यान, या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना भेटणार का?, असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता संजय राऊत म्हणाले की फडणवीसांना भेटण्याची काही गरज नाही, ते खोक्याखाली चिरडून काम करत आहेत. सरकार चालवताना त्यांच्या अंगावर ४० खोके पडले आहेत. त्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे, असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे.
#SanjayRaut #DevendraFadnavis #EknathShinde #Shivsena #UddhavThackeray #BJP #EC #NCP #Matoshree #Politics #Maharashtra #BalasahebThackeray #AmitShah
#SanjayRaut #DevendraFadnavis #EknathShinde #Shivsena #UddhavThackeray #BJP #EC #NCP #Matoshree #Politics #Maharashtra #BalasahebThackeray #AmitShah
Category
🗞
News