एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांना 'गद्दार', 'धोकेबाज' असे शब्द विरोधकांकडून वापरले जात आहेत. मात्र आता सामान्य जनतेतूनही याच शब्दांनी थेट सवाल विचारला जातो आहे. धाराशिवमध्ये असाच काहीसा प्रकार प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu kadu) यांच्यासोबत घडला. कोर्टाचे काम आटोपून बच्चू कडू बाहेर निघत होते. ते कार्यकर्त्यांशी, जनतेशी संवाद साधत होते. तेव्हा एक वृद्ध शेतकरी तेथे आले. यावेळी त्यांनी बच्चू कडू यांना थेट सवाल केला. 'तुम्ही गद्दारी केली, डाकूंसोबत गेलात', असं म्हणत वृद्ध शेतकऱ्याने आमदार बच्चू कडू यांना सुनावलं.
#BacchuKadu #ViralVideo #EknathShinde #Gaddar #Politics #Dharashiv #Osmanabad #PraharJanshakti #BaachchuKadu #Guwahati #Farmers #Shivsena #StateGovernment #Maharashtra
#BacchuKadu #ViralVideo #EknathShinde #Gaddar #Politics #Dharashiv #Osmanabad #PraharJanshakti #BaachchuKadu #Guwahati #Farmers #Shivsena #StateGovernment #Maharashtra
Category
🗞
News