• 2 years ago
महाराष्ट्र विधीमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी विधानसभेत बोलत असताना सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. भास्कर जाधव म्हणाले की काही दिवसांपूर्वी भाजपाच्या एका नेत्याने मला तुरुंगात टाकण्याचे वक्तव्य केले. मला तुरुंगात टाकले तरी मी घाबरणार नाही. पण त्या नेत्याने माझ्या मुलांचे नाव घेऊन चुकीचा उल्लेख केला. तुम्ही जर कुटुंबावर येणार असाल तर नियती तुम्हाला माफ करणार नाही, जे व्हायचे असेल ते होईल, पण मी गुडघे टेकणार नाही, अशी भूमिका भास्कर जाधव यांनी विधानसभेत मांडली.

#BhaskarJadhav #DevendraFadnavis #UddhavThackeray #MaharashtraBudget #Shivsena #EknathShinde #BJP #Maharashtra #Konkan #AjitPawar #SharadPawar

Category

🗞
News

Recommended