• 2 years ago
अलीबाबा आणि चाळीस चोर असं एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या लोकांना म्हटलं जातं आहे. खरी शिवसेना कुठली हे बघायचं असेल तर निवडणूक घ्या असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं आहे. ज्यांना तुम्ही चिन्ह आणि पक्ष दिलात तर भाजपाचा उमेदवार कसबा मतदारसंघात जिंकला असता. शिवसेनेची सुमारे ३५ ते ४० हजार मतं तिथे आहेत. पण ते सगळे उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मानतात. कागदावरच्या शिवसेनेला ते मानत नाहीत असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

#SanjayRaut #EknathShinde #DevendraFadnavis #BJP #Shivsena #GirishMahajan #DeepakKesarkar #AshwiniJagtap #LaxmanJagtap #Pune #Chinchwad #Bypoll #SoniaGandhi #Congress #Maharashtra

Category

🗞
News

Recommended